– हिंदू सणाच्या काळात बंधी का असा प्रश्न उपस्थित
– तरुणाचा रोजगार का हिरावता
– शिवसेना नगरसेवक यांनी केला प्रश्न
मोवाड :- नागपूर जिल्ह्यात आज रात्री पासून डीजे बंधी लावण्यात आली आहे. पण या बंधी चा विरोध नाही असा प्रश्न नगरसेवक ललित खंडेलवाल यांनी उपस्थित केला आहे. डीजे बंधू करायची आहे तर १ जानेवारी पासून संपूर्ण कार्यक्रमात करावी असा प्रश्न उपस्थित केला आहे. ३ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात फक्त हिंदू धर्माचे सण मोठ्या प्रमाणात आहे. अश्या वेळी डीजे बंदी करणे चुकीचे आहे.
गोकुळाष्टमी , गोपाळकाला , दही हंडी , बैल पोळा , तान्हा पोळा , गणेशोत्सव , नवरात्र व दिवाळी हे सगळे सण हिंदू धर्माचे आहे. या वेळी डीजे बंधी देणे चुकीचे आहे. राज्यात १ जानेवारी पासून संपूर्ण कार्यक्रमात डीजे बंधी करावी. धर्म पाहून बंदी करू नये अशी मागणी शिवसेना नगरसेवक ललित खंडेलवाल यांनी केली आहे. डीजे बंदी चा नियम सगळ्यांना समान द्यावा. फक्त एक धर्म पुरता मर्यादित नसावा अशी मागणी केली आहे. डीजे बंदी चा नियम मागे घेत १ जानेवारी पासून सगळ्या कार्यक्रमात डीजे बंदी करावी अशी मागणी ललित खंडेलवाल यांनी केली आहे.
तर तरुण मुलाना मिळणारा रोजगार सुद्धा या मधून हिसकावला जात आहे. त्यांच्या रोजगारावर मोठ संकट उभ राहणार आहे. फ्लॅशिग लाईट , लेझर लाईट साठी सक्ती चे नियम लागू केले पाहिजे. वेळ आणि डेसिबल चे पालन करून नियम लावयला पाहिजे. पण मात्र सरसकट व्यवसाय बंद कारण मात्र चुकीच आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होईल. म्हणून नागपूर जिल्ह्यात घेतलेला डीजे बंदी चा निर्णय मागे घेण्याची मागणी शिवसेना नगरसेवक ललित खंडेलवाल यांनी घेतली आहे यासाठी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निर्णय मागे घेऊन हिंदू सणा सुधी च्या वेळेस न घेता तर १ जानेवारी पासून संपूर्ण कार्यक्रमात घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.





