spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आज सायं. 4 वाजता मौदा येथे दहीहंडीचे आयोजन

– मुख्य आकर्षण सैराट ची आर्ची- रिंकू राजगुरू, महसूल मंत्री तथा पालकमंत्री व राज्यमंत्री राहणार उपस्थित 

किशोर साहू, मौदा :- मौदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक भारतीय जनता पार्टी कार्यालय समोर आज रविवार (ता. 13 सप्टेंबर) सायं. 4 वाजता उद्घाटक चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा व आशिष जयस्वाल राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मुख्य उपस्थितीत मौदा दहीहंडी महोत्सव पार पडणार आहे. मौदा दहीहंडी महोत्सव मध्ये मुख्य आकर्षण रिंकू राजगुरू सैराट फ्रेम आर्ची , कंटेंट क्रियेटर अँड रील स्टार अक्षय ढोबळे ,शशांक उदाखे उपस्थित राहणार आहे .

मौदा दहीहंडी फोडून जिंकणाऱ्या टीमला 1,11,101 रुपये (एक लक्ष अकरा हजार एक शे एक रुपये) बक्षीस ठेवण्यात आले आहे. मौदा भव्य दहीहंडी महोत्सव मध्ये जास्तीत जास्त चमुंनी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मौदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष प्रसन्ना बाबुराव तिडके, भाजपा मौदा शहर अध्यक्ष रमेश कुंभलकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश (बंटी )हटवार, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष कल्पना मानकर सह भारतीय जनता पार्टी मौदाचे समस्त सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे

मौदा दहीहंडी महोत्सव 2026 ला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सावनेर आशिष देशमुख, आमदार मध्य नागपूर प्रवीण दटके , विधान परिषद आमदार परिणय फुके , आमदार डॉ. राजीव पोतदार ,आमदार कृपाल तुमाने ,माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधाकर कोहळे ,भाजपा नागपूर जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, श्री श्री फाउंडेशन अध्यक्ष संकेत बावनकुळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चेतन खडसे, महिला आघाडी नागपूर जिल्हाध्यक्ष प्रीती मानमोडे, भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे सह जिल्हा व तालुक्यातील भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमाबाबत ची माहिती जास्तीत जास्त प्रसिद्धीसाठी मागील पाच दिवसांपूर्वीपासून स्वतःच्या स्टेटसवर व सोशल मीडियाच्या विविध ग्रुप वर पोस्ट टाकून भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा तारसा-धामणगाव जिल्हा परिषद सर्कल चे भावी युवा उमेदवार वीरेंद्र पायतोडे करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.