spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केळापूर जगदंबा संस्थानचा वतीने राष्ट्रपती पदकप्राप्त कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांचा सत्कार

पांढरकवडा :- भायखळा जिल्हा कारागृह मुंबईचे अधीक्षक (जेलर) म्हणून उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवा बजावणारे राष्ट्रपती सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले पांढरकवडा नगरीचे सुपुत्र विकास हनुमंतु रजनलवार यांचा दिनांक १७ सप्टेंबर रोजी केळापूर जगदंबा संस्थानचा वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याला वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार, केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा राजु तोडसाम, संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे, निवृत्त तहसीलदार हनुमंतु रजनलवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रमाचे फळ: माजी आमदार वामनराव कासावार

कार्यक्रमात बोलताना वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी सांगितले की, विकास रजनलवार यांनी अत्यंत खडतर परिश्रम आणि उत्कृष्ट कर्तव्यातून हा बहुमान मिळवला आहे. गेल्या २० वर्षांच्या प्रशासकीय सेवेत ३४ पुरस्कार मिळवणे आणि त्यात राष्ट्रपतींसारखा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणे ही अत्यंत भूषणावह गोष्ट आहे.

‘माणूस घडवणारी सेवा’- आमदार प्रा. राजु तोडसाम

आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी आपल्या भाषणात विकास रजनलवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “कारागृहात येणाऱ्या गुन्हेगारांकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता, त्यांच्यातील चुका सुधारून त्यांना एक चांगला माणूस बनवण्याचे व समाजोपयोगी कार्य करण्याचे समुपदेशन विकास यांनी केले. त्यांच्या कष्टाची व प्रामाणिक सेवेची ही पावती आहे.

सत्काराला उत्तर देतांना कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांनी या सन्मानाबद्दल सर्व ग्रामस्थांचे व वरिष्ठांचे मनापासून आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.