कुही तालुक्यात नुकत्याच झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये ग्रामविकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवले
कबड्डी स्पर्धेत मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच क्रिकेटमध्ये १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघांनी तालुक्यात बाजी मारत जिल्हास्तरावर धडक मारली.दरम्यान, आदित्य विजय भिवगडे याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ५१ किलोखालील वजनगटात तीन राऊंडमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर मात करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.या यशाबद्दल मुख्याध्यापक देवेंद्र बालमवार सर, तसेच भेंडारकर, पालंदुरकर, प्रा. वैशाली देशमुख आणि सर्व शिक्षकांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





