spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय कुस्ती स्पर्धेत नव्या खुबाळकरची दमदार कामगिरी, विभागीय विजेतेपद पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

खापा, वार्ताहर :- भंडारा येथे आयोजित विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत पीएमश्री नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, खापा येथील कुस्तीपटू कु. नव्या विनोद खुबाळकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय विजेतेपद पटकावले. १४ वर्षे वयोगटातील ६५ किलो वजनगटात नव्याने आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

या शानदार कामगिरीच्या जोरावर नव्या खुबाळकरची रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे पीएमश्री न.प. राजेंद्र हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

नव्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील नेहारे, न.प. खापाचे मुख्याधिकारी सचिन राऊत, न.प. खापाचे अध्यक्ष पियुष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, शिक्षण सभापती अंजली आनंद मेनकुदळे, शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग तसेच शिक्षकवृंदांनी तिचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

नव्याच्या यशामागे मुख्य प्रशिक्षक शामराव खडसे, सहाय्यक प्रशिक्षक सुनील गाडीगोणे व क्रीडाशिक्षक सुनील भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे आणि मेहनतीचे हे फलित असल्याचे सांगण्यात आले.

राज्यस्तरीय स्पर्धेतही नव्या खुबाळकरने उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे तसेच खापा शहराचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी सर्व स्तरातून तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Popular Articles