spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वाघाये महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

हंसराज,लाखनी :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख तथा ‘IQAC’ समन्वयक डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी केले.

याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. मंगेश कुकडे यांनी गांधीजींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व शास्त्रीजींच्या बालपणातील संस्कारांवर प्रकाश टाकला. तर दुसऱ्या वक्त्या प्रा. स्मिता तितीरमारे यांनी युवकांनी या दोन्ही महापुरुषांचे विचार आत्मसात करून देशसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. मनीषा सपाटे यांनी गांधीजींचे सत्य, अहिंसा, अस्पृश्यता निवारण आणि ‘भारत छोडो’ आंदोलनातील कार्य तसेच शास्त्रीजींनी दिलेल्या ‘जय जवान, जय किसान’ या नाऱ्याचे महत्त्व विशद केले.

यावेळी व्यासपीठावर प्रा. कागदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. हलमारे यांनी केले, तर आभार प्रा. ज्ञानेश्वरी रांगडाले यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles