spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवी पिढ़ी घडविण्या ची जबाबदारी अंगणवाड़ी सेविकांची – संध्या रायबोले यांचे प्रतिपादन 

कामठी :-  येणारी नवी पिढ़ी सुदृढ आणि निरोगी घडविण्या ची महत्वपूर्ण जबाबदारी अंगण वाड़ी सेविका आणि मदतनिस यांच्या वर आहे असे प्रतिपादन माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले.

देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भारतीय जनता पक्ष महिला आघाडी, कामठी शहराच्या वतीने ‘आंगण का मिलन’ हा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला.

नवी कामठी प्रभाग 16 गौतम नगर छावनी येथील अंगणवाड़ी केंद्र क्र 59 च्या सेविका अर्चना रामटेके, मदतनिस ममता रामटेके यांचा सत्कार भाजपा महिला आघाडी कामठी शहर अध्यक्ष बेबीनंदा बारई,उपाध्यक्ष संध्या रायबोले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रम प्रभारी रोशनी कानफाडे,समाज कार्य महाविद्यालय कामठी चे प्राध्यापक निशांत माटे, प्राध्यापक शशिकांत डांगे प्रामुख्याने उपस्थित होते.रिना वाघमारे, हंसमाला शेळके, प्रधन्या फुले, शांता देशभ्रतार, सुधा वासे, उमा लोणारे, आम्रपाली गजवे,लता मेश्राम, निकिता तिरपुड़े, आशा आळे, कांचन फुले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहकार्य केले.

Popular Articles