किशोर साहू, मौदा :- नवयुवक मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळ निलज (खंडाळा) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून मस्कऱ्या गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यात येत आहे. आज गुरुवार (ता. 8 ऑक्टोबर)ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (ता. 10 ऑक्टोबर)ला विसर्जन करण्यात येणार आहे, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव ठिकाणी भेट दिली असता सांगितले.
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास श्रावण चकोले, उपाध्यक्ष श्रीकांत सतपाल चकोले, सचिव गणेश उपासराव चकोले, सदस्यगण रोशन चिंधु चकोले, संदीप शंकर बाभरे, धीरज धर्मराज पाहुणे, युगांत संजय चकोले, पंकज देवचंद कारेमोरे, प्रभाकर मारोतराव चकोले, पवन शंकर चकोले, रामा गोमा शेंडे, राकेश भागवत चकोले, ग्रामपंचायत सदस्य धनराज नारायण चकोले , पुजारी रामचंद्र रुपराव चकोले परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.








