spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कामठीत काँग्रेसचे जोरदार निदर्शने; तहसीलदारांना निवेदन

– सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी शहर व तालुका काँग्रेसचा एल्गार; लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढा सुरूच राहणार

कामठी :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कामठी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात कामठी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा लढा!

लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया ही जनतेच्या विश्वासाचा आणि संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा मूलभूत आधार आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, केंद्रातील मोदी-शहा सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून निवडणूक व्यवस्थेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, असा आरोप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

जनतेचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष व्हावी आणि निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करावे, ही लोकशाहीची मूलभूत अपेक्षा आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांची निष्पक्ष चौकशी करून जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी लोकशाही, संविधान व मतदारांच्या हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष करीत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष करण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रमुख उपस्थिती

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, कामठी नगर परिषदेचे गटनेते काशीनाथ प्रधान, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, कामठी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज यादव, कामठी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनंता वाघ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव रुपेश शेंदरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता ताई रंगारी, प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सचिव नीरज लोणारे, नागपूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुमेध रंगारी, राजेश बनसिंगे, छत्रपाल करडभाजणे, नगरसेविका आम्रपाली सोनारे, वाघ गुरुजी, अजय बांगडे, नगरसेवक अतुल मानवटकर, अनिल बोरकर, राजेश कांबळे, कमलाकर मोहोड, अलंकार गजभिये, नगरसेवक अनिल सूर्यवंशी, साजिद कमाल अंसारी, नगरसेवक साजिद अंसारी, अविनाश डाहाट, कामरान जाफरी, नगरसेविका सातीका खांडेकर, मीर आरिफ अली, मधुकर ठाकरे, सरपंच योगिता धांडे, कमलाकर बांगरे, योगिता खोब्रागडे, आशिष मेश्राम, ममता कांबळे, सलामत अली, इरशाद शेख, इरशत खान, कृष्णा यादव, बंटी गोडेस्वार, वासीफ अंसारी, सुमित शेंडे, शिवम धुवे, शायदा अन्सारी, अंबिका रामटेके, सत्यफूला खोब्रागडे, किशोर धांडे, होमराज गोरले, अल्पेश सोमकुवर, नामदेव इंगोले, नवनीत साहारे, कांचन वाघमारे, राजेंद्र नायडू, सुमन डंभारे, सिधू मेश्राम, विजया गजभिये, नसरुद्दीन, प्रकाश गजभिये, हर्षवर्धन गजभिये, रामजी मेश्राम, हारून भाई, साफिक भाई, त्रिभुवन भिवगडे यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाही मूल्यांचे संरक्षण, मतदारांच्या अधिकारांची जपणूक आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी काँग्रेस पक्षाचा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles