spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा प्रथम वर्धापनदिन मुंबईत उत्साहात साजरा

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती

– राजा रामद्वार यांना मान्यवरांसोबत व्यासपीठावर स्थान

नागपूर :- स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा प्रथम वर्धापनदिन सोहळा शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील बिरला मातोश्री सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते व माजी खासदार तसेच महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर (भाऊ), राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, शिवसेना सचिव संजय मोरे, स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या वर्धापनदिन सोहळ्याला नागपूर व वर्धा जिल्ह्यातील स्थानीय लोकाधिकार सेनेचे अध्यक्ष राजा रामद्वार उपस्थित होते. यावेळी राज्यातील प्रमुख राजकीय नेते आणि महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यां सोबत व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर तसेच महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून संघटनेच्या वर्षभरातील वाटचालीचा आढावा घेण्यासोबतच आगामी काळातील संघटनात्मक कार्याला दिशा देण्याची संधी मिळाली. विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला संघटनात्मक महत्त्व प्राप्त झाले. स्थानिक नागरिकांचे प्रश्न, स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी संघटितपणे कार्य करण्याच्या दृष्टीने अशा कार्यक्रमांना महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. या कार्यक्रमाला स्थानीय लोकाधिकार सेना नागपूर- वर्धाचे उपाध्यक्ष मोरेश्वर पंचबुधे आणि अशोक जवंजाळ यांचीही उपस्थिती होती. मुंबई येथे झालेल्या या सोहळ्यात वरिष्ठ नेत्यांसोबत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने नागपूर- वर्धा विभागातील पदाधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. महासंघाचे अध्यक्ष गजानन (भाऊ) कीर्तिकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल राजा रामद्वार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आगामी काळात स्थानीय लोकाधिकार सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच स्थानिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Popular Articles