कामठी :- समस्त मानव जातीला विषमतेपासून दूर करण्याकरिता भारतरत्न प. पु.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसोबत धम्म दिक्षा घेतली होती. त्याच प्रेरनेणे प्रेरित होऊन लाखो अनुयायी दरवर्षी 14 ऑक्टोबरला म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमी येथे वंदन करायला येतात. या वर्षी सामाजिक न्याय विभागा तर्फे येणाऱ्या समस्त अनुयायी करिता करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी भेट देऊन पाहणी केली.
सामाजिक न्याय विभागाकडून यावर्षी सर्वसुविधा युक्त 21 डोम उभारण्यात आले आहे. येणाऱ्या सर्व बौध्द अनुयाया करिता उचित सुविधा मिळण्याकरिता सतत पाठपुरावा खासदार बर्वे यांनी केला. येणाऱ्या सर्व अनुयायांना पायाभूत चांगल्या सुविधा मिळणार असल्याचे खासदार बर्वे यांनी सांगितले. वा येत्या काळात अजून चांगल्या सुविधा मिळण्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले. यावेळी खासदार बर्वे यांचे सोबत प्रमुख रुपाने भन्ते हर्षबोधी, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप रंगारी उपस्थित होते.








