spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पुण्यात बोगस महाविद्यालयाचा प्रकार उघड

पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या अनेक महाविद्यालयांना पूर्णवेळ प्राध्यापक आणि प्राचार्य नसल्यामुळे विद्यापीठाने कारवाई करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, आता विद्यापीठाशी संलग्नित नसूनही विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे एक बोगस महाविद्यालय असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेऊ नये, असे जाहीर आवाहनच विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांनाच विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश देता येतो. परंतु, पुण्यातील सिनर्जी फाउंडेशनच्या सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स पुणे या महाविद्यालयाचा कोणताही थांगपत्ता लागत नसल्याचे समोर आले आहे.

एका विद्यार्थिनीने संबंधित महाविद्यालय टीसी देत नसल्याची तक्रार विद्यापीठाकडे केली होती. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही दूरध्वनी उचलला नाही. त्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन करून या समितीला संबंधित महाविद्यालयाच्या पत्त्यावर भेट देण्यासाठी पाठविले. मात्र, दिलेल्या पत्त्यावर हे महाविद्यालय अस्तित्वात नसल्याचे समितीला आढळून आले.

विद्यापीठाची संलग्न नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बेकायदेशीर आहे. तसेच, विद्यापीठाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर महाविद्यालय हलवता येत नाही. त्यामुळे विद्यापीठाने सिनर्जी फाउंडेशनच्या सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स महाविद्यालयावर कारवाई केली आहे.

विद्यापीठाचे उपकुलसचिव राजेश राहेरकर यांनी जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आले आहे. सिनर्जी फाउंडेशनच्या सिनर्जी स्कूल ऑफ कॉमर्स या महाविद्यालयास विविध कारणांमुळे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विद्यापीठाने संलग्नीकरण दिलेले नाही. तरी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सिनर्जी फाउंडेशन स्कूल ऑफ कॉमर्स या महाविद्यालयामध्ये कोणत्याही अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे या जाहीर प्रकटनात नमूद करण्यात आले आहे.

Popular Articles