spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात

– २ जणांचा होरपळून मृत्यू

अमरावती :-  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. चालत्या ट्रॅकचा अचानक टायर फुटल्यामुळे झालेल्या अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली. या दुर्घटनेत ट्रकमध्ये असलेले दोन व्यक्ती जिवंत जळून जागीच मृत पावल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भरधाव ट्रक फ्लॉवर विक्रीसाठी घेऊन जात असताना समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १२७ वर ही दुर्घटना घडली. सकाळी अचानक ट्रकचा टायर फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या तांत्रिक बिघाडानंतर ट्रकमध्ये तातडीने आग भडकली. आग इतकी भीषण होती की, ट्रक मधील प्रवाशांना बाहेर पडण्याची पुरेशी संधीच मिळाली नाही, ज्यामुळे दोघांचाही दुर्दैवी अंत झाला.

घटना समजताच संबंधित पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु तोपर्यंत ट्रक जळून खाक झाला होता. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Popular Articles