spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६  घरबसल्या मोबाईलवर अशी तपासा तुमची मतदार यादीतील नावे!

नागपूर :- विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबर रोजी होणार असून २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात यंदा एकूण ३८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदारांना आपली नावे ऑनलाईन उपलब्ध असून ती पाहण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

नागपूर विभागातून यंदा २ लाख ५५ हजार ६०३ नोंदणीकृत पदवीधर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ४४५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

घरबसल्या मोबाईलवर मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र कसे तपासावे?

पदवीधर मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि आपले मतदान केंद्र कोणते आहे, हे शोधण्यासाठी कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. मतदार खालील ८ सोप्या चरणांचा वापर करून मोबाईलवरून ही माहिती तपासू शकतात:

स्टेप १: सर्वात आधी आपल्या मोबाईलमधील Google ब्राउझर उघडा आणि maha voter search असे सर्च  करा.

स्टेप २: सर्च केल्यानंतर मिळालेल्या पहिल्या अधिकृत लिंकवर म्हणजेच          mahavotersearch.mahaelection.gov.in या वेबसाईटवर क्लिक करा.

स्टेप ३: वेबसाईट उघडल्यावर Constituency (मतदारसंघ) या पर्यायामध्ये Graduates’ (पदवीधर) हा पर्याय निवडा.

स्टेप ४: त्यानंतर Search By या पर्यायामध्ये District + Taluka + Name हा पर्याय निवडा.

स्टेप ५: आता District (जिल्हा) या कॉलममध्ये आपला जिल्हा निवडा. नागपूर विभागांतर्गत येणारे NAGPUR, WARDHA, BHANDARA, GONDIA, CHANDRAPUR किंवा   GADCHIROLI यापैकी तुमचा संबंधित जिल्हा निवडा.

स्टेप ६: Taluka (तालुका) हा पर्याय वैकल्पिक आहे. तालुका माहीत असल्यास निवडा, अन्यथा तो All  Talukas असाच राहू द्या.

स्टेप ७: आता आपली माहिती भरा. First Name मध्ये तुमचे नाव आणि Last Name मध्ये तुमचे आडनाव   टाका.

स्टेप ८: शेवटी खाली दिलेला Captcha Code अचूक टाईप करा आणि Search बटणावर क्लिक करा.

काय दिसते सर्च केल्यानंतर?

‘Search’ बटणावर क्लिक केल्यानंतर लगेचच स्क्रीनवर तुमचे नाव, तुमच्या मतदान केंद्राचा सविस्तर पत्ता, Part Number आणि Serial Number दिसून येईल.

मतदारांना आवाहन

नागपूर विभागातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी मतदानाच्या दिवसाची वाट न बघता आजच वरील प्रक्रियेद्वारे आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात न चुकता सहभाग नोंदवून मतदानासाठी सज्ज राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

Popular Articles