– सेवा संकल्प अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन
यवतमाळ :- सेवा संकल्प अभियानातंर्गत १५ ऑक्टोबर रोजी यवतमाळ तालुक्यातील नारकुंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील, विशेषतः कोलाम प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले उपलब्ध करून देणे हा होता.
या शिबिरात महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध महत्त्वाच्या सेवा पुरवण्यात आल्या. यामध्ये महिला शेतकरी नोंदणी, डिजिटल सातबारा चे वितरण, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचे दाखले यांसारख्या विविध महसूल सेवांचा समावेश होता.
हे शिबिर पारपाडण्यासाठी मंडळ अधिकारी नितीन खरोडे आणि ग्राम महसूल अधिकारी अरविंद गुरनुले यांनी विशेष परिश्रम घेतले व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले








