spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा पोलिसांची धडक कारवाई; अवैध कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १२ गोवंशीय जनावरांची सुटका, ५.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

– सिंगोरी फाटा येथे नाकाबंदी; बोलेरो पिकअपसह १२ गोवंश जप्त, गोशाळेत दाखल; पो.स्टे. कारधा येथे गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा कारधा :-   भंडारा जिल्ह्यात वाहतूक नियंत्रण शाखा (वा.नि.शा.) भंडारा यांच्या पथकाने धडक कारवाई करून अवैधपणे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १२ गोवंशीय जनावरांची सुटका केली. ही कारवाई दिनांक १४/१०/२०२६ रोजी रात्री सिंगोरी फाटा (एन.एच. ५३) येथे करण्यात आली. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नाकाबंदी केली. लाखनीकडून येणाऱ्या बोलेरो पिकअप (क्रमांक MH 36 AA 4156) वाहनास थांबण्याचा इशारा देण्यात आला असता, चालकाने वाहन सोडून पळ काढला. वाहनाची पाहणी केल्यानंतर ५ गाई, ३ गोरी कालवड व ४ गोरे अशा एकूण १२ गोवंशीय जनावरांना दाटीवाटीने व चारा-पाण्याशिवाय क्रूरतेने कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले.

या कारवाईत ५,२०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात गोवंशीय जनावरे (१२ नग) – अंदाजे रु. १,२०,०००/- व बोलेरो पिकअप वाहन – अंदाजे रु. ४,००,०००/- इतका समावेश आहे. जप्त करण्यात आलेली सर्व जनावरे सुरक्षिततेसाठी भागीरथा गो अनुसंधान बहुउद्देशीय संस्था, मालीपार/चांदोरी (ता.जि. भंडारा) येथे दाखल करण्यात आली. तसेच बोलेरो पिकअप वाहन पोलीस स्टेशन कारधा येथे जमा करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन कारधा येथे अप. क्र. 756/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार स.फौ. सुनिल टिकाराम राऊत (वा.नि.शा. भंडारा) यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध कलम ११(१)(अ)(ड)(ई) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा तसेच कलम ९ महा. प्राणी संरक्षण अधिनियम आणि कलम ३(५) भा.न्या.सं. २०२३ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईत स.फौ. सुनिल राऊत, पो.ना. अमित वंजारी, पो.शि. संदीप राहांगडाले, पो.शि. राहुल फेंडर, पो.शि. सागर मोहतुरे तसेच वाहन चालक पोहवा महेश मंडीये यांचा समावेश होता

Popular Articles