spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवदुर्गा उत्सव मंडळाच्या जस जागरणात नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांची उपस्थिती

– माँ दुर्गेचे दर्शन घेत नगरवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना; रेल्वे स्टेशन परिसरातील कार्यक्रमाला भाविकांची उपस्थिती

संदीप कांबळे, कामठी :- रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिराजवळील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या माँ दुर्गेच्या पंडालात आयोजित जस जागरण कार्यक्रमाला कामठी नगर परिषद अध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माँ दुर्गेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले तसेच कामठी शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आयोजित या जस जागरण कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. देवीच्या भक्तिगीतांनी आणि जागरणाच्या उत्साहपूर्ण वातावरणाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपणाऱ्या अशा उत्सवांमुळे नागरिकांमध्ये श्रद्धा, बंधुभाव आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष मंगेश यादव, नगरसेवक लालसिंग यादव, नगरसेवक नितेश यादव, नगरसेवक नीरज यादव, राजेश खंडेलवाल, माजी नगरसेवक कपिल गायधने, गोपाल सीरिया, आशु अवस्थी, अथर्व पिंगले, हर्षल लिंबाचिया, सोयम यादव, कृष्णा खंडेलवाल, शानू ग्रावकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विजय कोंडुलवार, रोशन यादव, आर्यन मेंश्राम, रोशन दुबे, अवि खोले, देवेंद्र ठाकूर, पराग गडवे, कल्लू यादव, नितीन उके, आशीष यादव आणि नीतू दुबे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.

Popular Articles