spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएम श्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा

किशोर साहू, मौदा :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दहेगाव येथे गुरुवार (ता. १५ऑक्टोबर) रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानला केंद्राचे केंद्रप्रमुख राजू आंबीलकर होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी केले. त्यांनी वाचनाचे व स्वच्छतेचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा रामटेके मॅडम यांनी केले.

याप्रसंगी शिक्षकवृंद सुधीर कांबळे , शसुधीर खंडाईत, राजेश रोहाड , सुजाता बोदेले , संगीता आंबीलढुके ,ज्योती आंबिलढुके , उमेश उके, पुष्पलता उके, रंजना उके यांनी विशेष सहकार्य केले. शिक्षिका सुजाता बोदेले यांनी आभार प्रदर्शन केले.

Popular Articles