spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आरमोरीवरून गोंदिया आणि चांदा फोर्टशी कनेक्टिव्हिटी

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीकरांसाठी रेल्वेच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गोंदिया–वडसा मेमू रेल्वे आता आरमोरीपर्यंत विस्तारित करण्यास, तर वडसा–चांदा फोर्ट मेमू रेल्वे आरमोरीपर्यंत सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आरमोरीच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भर पडणार आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने या विस्ताराला मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्ष रेल्वे सेवा कोणत्या तारखेपासून सुरू होणार, याची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

आरमोरीवरून गोंदिया आणि चांदा फोर्टशी थेट कनेक्टिव्हिटी

दरम्यान, वडसा-गडचिरोली या 52 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून सद्यस्थितीत वडसा-आरमोरी या 18 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. 22 सप्टेंबर रोजी चाचणीसाठी पहिल्यांदाच वडसा ते आरमोरी पॅसेंजर ट्रेन धावली होती. आता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रातून या दोन्ही रेल्वे सेवांच्या विस्ताराला हिरवा कंदील देण्यात आला आहे.

दोन्ही सेवांसाठी वेळापत्रकही मंजूर

विशेष म्हणजे, या दोन्ही सेवांसाठी वेळापत्रकही मंजूर ठरले आहे. मंजूर वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक ६८८०६ ही गोंदिया–वडसा मेमू रेल्वे गोंदिया येथून संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटेल. रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी वडसा येथे पोहोचेल. आणि पाच मिनिटांच्या थांब्यानंतर रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी आरमोरीच्या दिशेने रवाना होईल. ही रेल्वे रात्री १० वाजता आरमोरी येथे पोहोचण्याचे वेळापत्रक मंजूर करण्यात आले आहे. तर गाडी क्रमांक ६८८०८ चांदा फोर्ट मेमू रेल्वे आता आरमोरी येथून सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Popular Articles