नागपूर :- श्री चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर, बाहुबलीनगरच्या प्रांगणात आयोजित गरबा महोत्सवात धर्ममय भक्तीचा उत्साह दिसून येत आहे. दररोज महिला, पुरुष आणि लहान मुले भक्तीत लीन होऊन मातेच्या चरणी नृत्यावर थिरकत आहेत. संपूर्ण वातावरण उत्साही, श्रद्धा आणि भक्तीने भरलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला आणि युवा शाखेच्या सदस्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.
शनिवारी माता पद्मावतींसमोर दीपप्रज्वलन नरेश कहाते, राजेश कहाते, अनिरुद्ध मचाले, पूजा मचाले, अखिल भारतीय पुलक मंच परिवाराचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोज बंड, राष्ट्रीय प्रवक्ते दिलीप सावळकर, महावीर वार्ड शाखेचे अध्यक्ष जगदीश गिल्लरकर, महाल शाखेचे अध्यक्ष राजेंद्र सोनटक्के, महावीर वार्ड शाखेचे महामंत्री राजेश जैन, महाल शाखेचे महामंत्री मनोज मांडवगडे, बाबा पदम, रमेश उदेपुरकर, अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्थेचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष श्रीकांत तुपकर, डॉ. रूपाली तुपकर, जितेंद्र गडेकर, प्रशांत कहाते, सविता मांडवगडे, मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र जैन बंड आणि सचिव सुरेश वरुडकर यांनी केले.
शनिवारी गरबा महोत्सवाची सुरुवात लहान मुलांच्या नृत्याने झाली, त्यानंतर पती-पत्नी गरबा रंगला. भक्तीच्या तालावर नृत्याची पावले थिरकत होती. रविवारी दुपारी माता पद्मावती पूजन विधान संपन्न झाले.
हा गरबा नृत्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी बाळा विटालकर, डॉ. विक्रांत सावरकर, तेजस दर्यापुरकर, दीपेश जैन, नितीन सावळकर, प्रदीप नखाते, रितेश राखे, आशिष मोपकर, किरण सावळकर, संध्या वरुडकर, प्रियंका महात्मे, गौरी जैन, प्रिया सावळकर, नंदा सोईतकर, विद्या नखाते आदींनी सहकार्य केले.








