spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बावणे कुणबी समाज युवा समिती अध्यक्षपदी उमेश मोहतुरे यांची पुन्हा निवड

– दुसऱ्यांदा अविरोध निवड; जिल्हा कार्यकारिणीही गठित

हंसराज,भंडारा :- बावणे कुणबी समाज सेवा मंडळ, भंडारा अंतर्गत कार्यरत बावणे कुणबी समाज युवा समितीच्या अध्यक्षपदी उमेश अमृत मोहतुरे (मु. इंदुरखा, पोस्ट कोथूर्णा, ता. जि. भंडारा) यांची दुसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या सभेत उपस्थित सदस्यांनी सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मोहतुरे यांची पहिली निवड सन २०१९ मध्ये झाली होती.

सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष किसन शेंडे होते. सचिव महेश कुथे यांच्यासह संचालक बाबा पाटेकर, दिनेश फेंडर, अनिल गायधने, सूर्यकांत इलमे, रुपेश टांगले, विवेक पडोळे, जयश्री बोरकर, अंजली बांते यांच्यासह मंडळाचे इतर संचालक व सदस्य उपस्थित होते.

या वेळी युवा समितीची जिल्हास्तरीय कार्यकारिणीही गठित करण्यात आली. कार्याध्यक्षपदी चेतन सुरेश चेटुले, उपाध्यक्षपदी शिवेश कडव व पराग आगाशे, सचिवपदी गजानन कुंभारे व भूषण डाहारे, सहसचिवपदी अनिकेत बोरकर व मोहित पाटेकर, तर प्रसिद्धी प्रमुखपदी वेदांत झंझाळ यांची निवड झाली. सदस्यपदी सुनील पंचबुधे, आनंद मोहतुरे, आराध्य गायधने, उत्कर्ष राखडे, स्वस्तिक बाभरे, मंदार शेंडे व ऋषभ तिजारे यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर आभार मानताना मोहतुरे यांनी समाजहिताचे कार्य करण्याचा, सर्वांना सहकार्य करण्याचा आणि विविध उपक्रम राबवून युवकांना समाजाशी जोडण्याचा मानस व्यक्त केला. मंडळ व समाजबांधवांकडून नवनियुक्त अध्यक्ष व कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.

Popular Articles