spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रोटावेटर चोरीचा गुन्हा उघड; आरोपी अटकेत

– वडोदा पोलिसांची कामगिरी; १ लाख २ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी :- शेतातून रोटावेटरची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वडोदा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २ हजार ६७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर ढोरे लेआउट, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथील रहिवासी रेशमा माणिकराव चौधरी (वय ४५) यांनी वडोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शेतातील रोटावेटरची चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी वडोदा पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करताना वडोदा पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित आरोपी संजय भाऊरावजी झुंजाळ (वय ३८, रा. गारला, ता. कामठी, जि. नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रोटावेटर चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला रोटावेटर, किंमत १ लाख २ हजार ६७८ रुपये, जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज गवाडे आणि त्यांच्या पथकाने केली.

Popular Articles