spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खाप्यात २५ ऑक्टोबरला खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा,२० हजारांची रोख पारितोषिके; ६० चषक व ८० पदकांचे आकर्षण

खापा, वार्ताहर :- बुद्धिबळ खेळाचा प्रसार व्हावा, तसेच नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्व. किसानराव चव्हाण स्मृती द्वितीय खापा खुली एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पॉवर चेस अकॅडमी आणि ब्रिलियंट चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, चेस असोसिएशन नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी तान्या सेलिब्रेशन हॉल अँड लॉन्स, खापा येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे एकूण २० हजार रुपयांची रोख पारितोषिके, ६० चषक आणि ८० पदके. सात, नऊ, अकरा, तेरा आणि पंधरा वर्षांखालील मुले व मुलींसाठी स्वतंत्र वयोगटांसह खुल्या गटातही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे विविध वयोगटांतील बुद्धिबळपटूंना आपली बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि रणनीती कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धा रॅपिड प्रकारात खेळविण्यात येणार असून, प्रत्येक खेळाडूला १० मिनिटे आणि प्रत्येक चालीसाठी ५ सेकंदांची अतिरिक्त वेळ देण्यात येईल. सहभागी खेळाडूंच्या संख्येनुसार फेऱ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून एसएनए आकाश रेवतकर काम पाहतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आयोजकांकडून मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश शुल्क ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

ऑनलाइन नोंदणी सुरू

इच्छुक खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://circlechess.com/registration?id=56413 या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी निलेश चन्नवार (९०२८४ ५६००७) तसेच IA दीपक चव्हाण (९७३०७ ५५४८६ / ७७९८१८३८९६) यांच्याशी संपर्क साधावा.

बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन देत नवोदित आणि गुणवंत खेळाडूंना पुढे आणण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत जास्तीत जास्त बुद्धिबळपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन पॉवर चेस अकॅडमी आणि ब्रिलियंट चेस अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles