spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी खासदार सुनील मेंढे व शुभांगी मेंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क

हंसराज,भंडारा :- नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी भंडारा येथे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुनील मेंढे आणि त्यांच्या पत्नी शुभांगी मेंढे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी पदवीधर मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले होते.

मेंढे यांनी सांगितले की, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तरुण आणि पदवीधरांच्या हक्काच्या मागण्या व अडीअडचणी सोडवण्यासाठी योग्य उमेदवाराला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. मागील काही निवडणुकांचे अनुभव लक्षात घेता, पदवीधरांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सक्षम उमेदवाराची निवड करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असेही त्यांनी म्हटले होते.

Popular Articles