spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शकूर नागानी यांची गडचिरोली जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

– प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्णयानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

कामठी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा कामठी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शकूर नागानी यांची गडचिरोली जिल्ह्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. या नियुक्तीनिमित्त काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शकूर नागानी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नागानी हे काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. कामठी नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी कामकाज पाहिले आहे. त्यांच्या राजकीय व संघटनात्मक अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सत्कारप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल आणि अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षांसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी नागानी यांचा सन्मान करून त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजकुमार गेडाम, फारूक कुरेशी, परवेज शाहीन, सोहेल अंजुम, राजू भागवत, हारून , प्रणाली बनसोड, फिरोज, शहनवाज आणि नसीम खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शकूर नागानी यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नव्या जबाबदारीमुळे गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस संघटनेच्या कार्याला बळ मिळण्याची अपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Popular Articles