spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी दिनी त्रिवार वंदन

कन्हान :- ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शिवरत्न कार्यालय विवेकानंद नगर कन्हान येथे ग्राम विकासातु न देशौन्नती साधुन वैश्विक शांतीचा मार्ग दाखवणारे राष्ट्रसंत तुकोडीजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी पावन चरणी त्रिवार वंदन करून ५८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

शुक्रवार (दि.३०) ऑक्टोंबर २०२६ ला ग्रामौन्न ती सेवा प्रतिष्ठाण व्दारे शिवरत्न कार्यालय विवेकानंद नगर कन्हान येथे सायंकाळी ४ वाजता गुरूदेव सेवा मंडळाचे जगन येणेकर,अजय भोसकर, धनराज उरकुडे, सुधाकर मेश्राम, रवि आजबले यानी गुरूदेवा च्या भजनाने राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची ५८ वी पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

४.५७ वाजता ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव, माजी रामटेक पं. स. सभापती तथा माजी जि प सदस्य मा. कैलास राऊत, श्रीपाद भालेराव यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकोडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दिप प्रज्वलित करून उपस्थित सर्वानी सामुहि क प्राथना करून राष्ट्रसंत तुकडोजी महराजांना तिवार वंदन करण्यात आले. याप्रसंगी कैलास राऊत व प्रकाश जाधव हयानी राष्ट्रसंताच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन करून राष्ट्रसंत तुकोजी महाराजांची ५८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कमलेश पांजरे यांनी केले तर आभार सचिन साळवी यांनी व्यकत केले. कार्यक्रमास मधुकर नागपुरे, गणेश खांडेकर, कृष्णराव भायदे, श्रीराम नांदुरकर, शालिकराम ठाकरे, मोतीराम रहाटे, कमलसिंह यादव, किशोर अरोरा, बालाजी नायर, नेवालाल पात्रे, सुतेश भोयर, अशोक पोटभरे, प्रदीप वानखेडे, पुरूषोत्तम येणेकर, रविंद्र चकोले, जीवन ठवकर, उमाकांत नागपुरे, मोहन भोयर, अशोक मेश्राम, जस्सीन भालेकर, मल्हार साळवी, निशांत जाधव, प्रणाली राऊत, लता वंजारी, कल्पना जाधव, माया भोयर, उषा बंड, कविता पोटभरे, चंपा गजभिये, इंदा पात्रे सह ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाणचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Popular Articles