काटोल :- फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन काटोल येथे अप क्र. ३८०/२०२१ कलम ३५४, ३५४ (अ), ४५१ भादवि सह कलम ८ पोक्सो अन्वये गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, दिनांक ०९/०८/२०२१ रोजी यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १४ वर्षे ही घरात एकटी असतांना यातील आरोपी परमेश्वर विठोबाजी कोटनाके, वय ४० वर्षे, रा बोरी, ता. काटोल याने फिर्यादीच्या घरात घुसुन फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला अश्लिल स्पर्श करून तिला पलंगावर ढकलुन तिचा विनयभंग केला असता अल्पवयीन पिडीता त्याच्या हाताला चावा घेवुन तेथुन पळुन गेली. नमुद प्रकरणी पोलीस स्टेशन काटोल येथे वरप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासी अधिकारी अश्विनी वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक, काटोल यांनी सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास केला. त्यानंतर संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक, काटोल यांनी तपास केला तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास आकाश शाही, पोलीस उपनिरीक्षक काटोल यांनी करून आरोपी विरूध्द सबळ पुराव्यानिशी दोषारोपत्र मा. न्यायालयात दाखल केले. दिनांक ३०/१०/२०२६ रोजी मा. जिल्हा व सत्र न्यायधीश क्रं १३ एन. आर. तळेकर यांनी नमुद आरोपीस कलम ३५४ भादवी मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व ४०००/ रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा करावास, कलम ४५१ भादवि मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास २ आठवडे साधा कारावास तसेच कलम ८ पोक्सो मध्ये ३ वर्ष सश्रम कारावास व ४०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारचे वतीने ए.पी.पी. शाहजहा शेख यांनी काम पाहीले. सदर खटल्याच्या सुनावली दरम्यान पराग पोटे, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल उपविभाग, पोलीस निरीक्षक शरणजीत शिरसाठ, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन काटोल, पोलीस निरीक्षक विशाल गिरी, दोषसिध्दी कक्ष, नागपुर ग्रामीण, सपोनि विशांत नांदगाये, पोहवा रामदास कोराम, ब.नं २२४, नेम. दोषसिध्दी कक्ष, नागपुर ग्रामीण, पोहवा बाबा नेवारे ब. नं. ८२ पोलीस स्टेशन काटोल यांनी महत्वपुर्ण योगदान दिले.








