spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महसुली वाद सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न

हंसराज,भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत’ आज ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे अपर जिल्हाधिकारी स्तरावरील महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आली. या लोक

अदालतीमध्ये भंडारा व पवनी तालुक्यांतील महसुली प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी संबंधित प्रकरणांतील पक्षकार उपस्थित होते.

पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन परस्पर सामंजस्य व तडजोडीच्या माध्यमातून महसुली वाद निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अपर जिल्हाधिकारी स्तरावरील पुढील लोक अदालत २६ नोव्हेंबर रोजी तुमसर व मोहाडी तालुक्यांतील, तर १७ डिसेंबर रोजी लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यांतील प्रकरणांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच १६ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी स्तरावर आणि १५ डिसेंबर रोजी तहसील स्तरावर संबंधित कार्यालयांमध्ये लोक अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

या अभियानामुळे प्रलंबित महसुली प्रकरणांचा निपटारा होण्यास मदत होणार असून, नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. महसुली वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार आणि अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी केले आहे.

Popular Articles