नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थाच्या माध्यमाने साईबाबा नगर, वाठोडा रिंग रोड, नागपूर येथे हलबा समाजाची कोजागिरी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात बिरसा मुंडा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,भारतरत्न डॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या छायाचित्रास माल्यार्पण करू अभिवादन केले. आदिवासी हलबा समाज विकास संस्थेच्या कोजागिरी कार्यक्रमाला अध्यक्ष रवींद्र फनिभरे यांनी मार्गदर्शन केले चंद्रभान पराते, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी, धनराज पखाले, राष्ट्रीय आदिम कृती समितीचे कोर कमेटी सदस्य, तसेच . नागोराव पराते, आदिम कर्मचारी संघटनेचे महासचिव यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

आदिम हलबा, हलबी या आदिवासींचा संविधान यादीत समावेश असूनही कोष्टी या व्यवसायामुळे आदिम हलबांचे संविधानातील अधिकार रद्द करण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र तपासणी समितीने ज्यांना कोष्टी म्हणून घोषित करून हलबा, हलबी या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्रे अवैध केले, त्या शेकडो तथाकथित कोष्टी यांना उच्च न्यायालयाने संविधान यादीतील हलबा, हलबी असल्याचे मान्य करून वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्णय दिलेत, या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने घटना दुरुस्ती करावी,यासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीकडून आंदोलने होत असल्याने सर्वांना सहभागी व्हावे असे आवाहन माजी अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भास्कर चिच़घरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता सोनक हिने केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता अशोक चिचघरे, चंद्रभान खांबाळकर, सुधाकर बोकडे, संगीता सोनक, बेबी खापरे,राखी धापोडकर, व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.








