spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रमाई महिला महाविद्यालय येथे तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी 

पारशिवनी :- रमाई महिला महाविद्यालय, नयाकुंड, पारशिवनी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन प्रमुख प्रिया चौहान होत्या. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. विद्यार्थिनींनी स्वीटी सोमकुवर आणि योगिनी शेओडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ गीत सादर केले. यानंतर विद्यार्थिनींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर, विचारांवर तसेच त्यांच्या सामाजिक योगदानावर भाषणे सादर केली. तसेच राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि ग्रामगीतेतील संदेशाचा विद्यार्थिनींना परिचय व्हावा, या उद्देशाने ग्रामगीतेचे महत्त्व या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रुपाली भुते, नेहा ठाकरे , शिवानी अंबादे व कांचन गाते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कोमल नेरकर हिने केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकास, सामाजिक एकता, स्वच्छता आणि मानवतेच्या विचारांचा प्रसार विद्यार्थिनींपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. अशा उपक्रमांमधून विद्यार्थिनींमध्ये सामाजिक जाणीव, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रसंतांच्या विचारांविषयी आदर निर्माण होण्यास मदत होते.

Popular Articles