spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिवाळीपूर्वीच दिव्यांग बांधवांना मिळाली आनंदाची भेट!

– सनी चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

बुटीबोरी :- दिवाळीपूर्वीच दिव्यांग बांधवांना मिळाली आनंदाची भेट! सनी चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश बुटीबोरी नगर परिषदेकडून ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप; दिव्यांग बांधवांची दिवाळी होणार गोड! बुटीबोरी : दिवाळीच्या सणापूर्वीच बुटीबोरी शहरातील दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नगर परिषद बुटीबोरीकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील दिव्यांग कल्याणासाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले आहे. नगरसेवक उदयसिंह (सनी) रतनसिंह चौहान यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, दिवाळीपूर्वीच दिव्यांग बांधवांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. बुटीबोरी शहरात १५० पेक्षा अधिक दिव्यांग बांधव असून, शासनाच्या नियमानुसार नगर परिषदेच्या स्वउत्पन्नातील ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. मात्र, चालू आर्थिक वर्षातील निधीचे वाटप रखडल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी होती. या गंभीर विषयाची दखल घेत नगरसेवक सनी चव्हाण यांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करून निधीचे तातडीने वाटप करण्याची मागणी केली होती. तसेच तीन दिवसांत निधी वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांना केले होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याची प्रशासनाने दखल घेत दिव्यांग कल्याण निधीचे वाटप केले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर दिव्यांग बांधवांना आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून, त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिवाळीपूर्वी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा निर्णय ठरला असून, सनी चव्हाण यांच्या पाठपुराव्याची बुटीबोरी शहरात चर्चा होत आहे.

Popular Articles