Related Posts

खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता!

<p><strong>&&num;8211&semi; परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी अपूर्ण&semi; न्यायवैद्यकीय अहवालातही आरोपींविरुद्ध ठोस पुरावा नाही&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> खापा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खून व खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील तिन्ही आरोपींची नागपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली&period; गौतम योगेश भंडारे&comma; नितेश भीमराव कोचे आणि नीलकंठ ऊर्फ कंठीराम रघुनाथ फाळके अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत&period; या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड&period; करण बिहाउत यांनी प्रभावी युक्तिवाद केला&period; त्यांना ॲड&period; रेणुका शेळके व ॲड&period; महेश गभणे यांचे सहकार्य लाभले&period; परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी अपूर्ण असून&comma; न्यायवैद्यकीय अहवालातूनही आरोपींना गुन्ह्याशी जोडणारा ठोस पुरावा समोर आला नसल्याचे न्यायालयाने नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>अभियोजन पक्षाच्या कथनानुसार&comma; २९ ऑगस्ट २०२२ रोजी कोच्छी बॅरेक परिसरातील कडुलिंबाच्या झाडाजवळ सिद्धार्थ फत्तू पाटील हे डोक्यासह शरीरावर गंभीर जखमा झालेल्या अवस्थेत आढळून आले होते&period; त्यांना उपचारासाठी नागपूर येथील अलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले&period; पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले&period; या घटनेप्रकरणी सुरुवातीला अज्ञात व्यक्तींविरुद्ध खापा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता&period; त्यानंतर मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम ३०२ समाविष्ट करण्यात आले&period; तपासादरम्यान पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता&period; अशा प्रकरणात आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करण्यासाठी घटनांची अखंड व विश्वासार्ह पुराव्यांची साखळी आवश्यक असते&period; मात्र&comma; अभियोजन पक्षाला अशी साखळी सिद्ध करता आली नाही&comma; असे न्यायालयाने स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आरोपी क्रमांक एक याच्या कथित माहितीवरून गुन्ह्यात वापरण्यात आलेला दगड जप्त केल्याचा दावा अभियोजन पक्षाने केला होता&period; मात्र&comma; पंच साक्षीदाराच्या साक्षीनुसार हा दगड वडाच्या झाडाखाली आढळला होता&period; जप्तीची जागा खुली व सर्वांना सहज उपलब्ध असल्याने ती आरोपीच्या विशेष माहितीतील असल्याचे सिद्ध होत नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदविले&period;<&sol;p>&NewLine;<p>याशिवाय&comma; न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालात आरोपींच्या कपड्यांवर किंवा जप्त केलेल्या दगडावर आरोपींना गुन्ह्याशी जोडणारा कोणताही आक्षेपार्ह पुरावा आढळून आला नाही&period; उपलब्ध वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे मृत्यूच्या स्वरूपाबाबतही न्यायालयाने शंका व्यक्त केली&period; त्यामुळे अभियोजन पक्षाला आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करता आले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बचाव पक्षाने साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती&comma; परिस्थितीजन्य पुराव्यांतील त्रुटी&comma; दगड जप्तीच्या प्रक्रियेतील संशयास्पद बाबी तसेच न्यायवैद्यकीय अहवालातील निष्कर्ष न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले&period; या सर्व बाबींचा विचार करून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी तिन्ही आरोपींची भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२&comma; ३०७ सह ३४ मधील आरोपांतून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २३५&lpar;१&rpar; अन्वये निर्दोष मुक्तता केली&period;<&sol;p>&NewLine;