Related Posts

उत्कृष्ट कामगिरी करणारे २८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

<p><strong>&&num;8211&semi; दीक्षाभूमीवरील बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेची घेतली दखल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> दीक्षाभूमी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडणाऱ्या नागपूर पोलीस दलातील २८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला&period; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पोलीस भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होतात&period; या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखणे&comma; वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अनुयायांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे&comma; हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते&period;या वेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्कता&comma; नियोजन व समन्वय राखत आपली जबाबदारी पार पाडली&period; त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हा सन्मान करण्यात आला&period; कार्यक्रमाला पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;