नागपूर :- दिवाळीसोबतच जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २५५३ वा निर्वाण कल्याणक महोत्सव सोमवारी देशभरात श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. अनेक जैन आचार्य, मुनी आणि साध्वींच्या उपस्थितीत सकाळी निर्वाण लाडू अर्पण करण्यात आले. इतवारी येथील शहीद चौक स्थित श्री पार्श्वप्रभु दिगंबर जैन सैतवाळ मंदिरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली होती. महावीर स्वामींच्या वेदीजवळ श्री निर्वाण क्षेत्र पूजा पं. अभिजित बंड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. निर्वाण क्षेत्र पूजन चंद्रकांत पळसापुरे परिवाराने पूर्ण केले. पूजेनंतर प्रथम निर्वाण लाडू अर्पण करण्याचा मान आनंदराव, ॲड. संतोष, नितीन, अंकुर, अनुज, यश, अर्चना, अपर्णा, वैशाली, श्रद्धा नखाते परिवाराला मिळाला. काकड आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. भक्तांनी एकमेकांना महावीर निर्वाण आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
मंदिराचे अध्यक्ष दिलीप राखे, आनंदराव नखाते, महामंत्री सुधीर सिनगारे, अनंतराव शिवणकर, मनीष पिंजरकर, विलास गिल्लरकर, ऋषभ आगरकर, प्रशांत मानेकर, नरेश मचाले, जितेंद्र गडेकर, दिनेश सावळकर, माजी अध्यक्ष आनंदराव सवाने, दिलीप शिवणकर, सुनील आगरकर, पं. हिरासाव कहाते, चंद्रकांत सावळकर, नितीन पळसापुरे, सौरभ गव्हाणे, दिनेश जैन, प्रमोद राखे, दिनेश येळवटकर, नितीन महात्मे, श्रीकांत तुपकर, सतीश मखे, चेतन उदोले, अरुण श्रावणे उपस्थित होते.






