spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पहाटेच्या DJ पार्टीवर पोलिसांचा छापा!

– पार्टीत 16.53 लाखांचा मुद्देमाल जप्त

पाचगाव :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि मयंक माधव, सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, उमरेड उपविभाग यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन पाचगाव यांच्या नेतृत्वात पाचगाव पोलीसांनी पोलीस स्टेशन पाचगाव हद्दीतील मौजा शिवणी रिठी परिसरातील सुकासा फार्म हाऊस येथे पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या विनापरवानगी पार्टीवर कारवाई केली. या कारवाईत डीजे साउंड सिस्टिम, जनरेटर, पिकअप वाहन, विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य व इतर साहित्य असा एकूण १६,५३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच ३ आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ०९/११/२०२६ रोजी पहाटे ०४:३० वाजताच्या सुमारास पाचगाव पोलीस रात्र गस्त झु‌टीवर असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत मौजा शिवणी रिठी येथील सुकासा फार्म हाऊस येथे विनापरवानगी डीजे लावुन नाचगाणे सुरू असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जनरेटर, अशोक लेलैंड कंपनीची पिकअप गाडी, मोठे बास साउंड बॉक्स, टोन बॉक्स, अॅम्प्लिफायर, मॉनिटर, पॉवर ट्रॉली, एलईडी पार लाईट, एलईडी स्ट्रोब, मिक्सर, कन्सोल, स्मोक मशीन, पार लाईट, क्रॉसर, स्प्लिटर, ३ प्लेअर, लॅपटॉप, आणि इतर साहित्य मिळुन आले. तसेच घटनास्थळी विदेशी दारूच्या रिकाम्या आणि अर्धवट भरलेल्या बाटल्याही मिळुन आल्याने किंमती १६,५३,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर प्रकरणी आरोपी १) नितेश विलास शेंबेकर, रा. हुडकेश्वर, नागपूर (सुकासा फार्म हाऊस मालक) २) फिरोज जमील शेख, वय ३० वर्षे, रा. हनुमान वॉर्ड, भंडारा (पार्टीचे आयोजक) आणि ३) विनय पृथ्वीराज हिरेखन, वय ३२ वर्षे, रा. इंदोरा चौक, नागपूर (डि.जे मालक) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन पाचगाव येथे कलम २२३, ३(५), भान्यासं सह कलम ६८ महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन पाचगाव करीत आहेत.

नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडून विनापरवानगी पार्टी, ध्वनिप्रदूषण तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Popular Articles