spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डॉ. बरखा जयदेव तिरपुडे यांना रसशास्त्र व भैषज्य कल्पना विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

– कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव

नागपूर :-  डॉ. बरखा जयदेव तिरपुडे यांनी आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले असून, त्यांना रसशास्त्र व भैषज्य कल्पना या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, अडाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, सावंगी मेघे, वर्धा येथे आयोजित १७ व्या दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. बरखा तिरपुडे यांच्या संशोधनाचा विषय “Evaluation of Repeated Dose Sub-Chronic Toxicity and Antimicrobial Study of Shilasindoor ” हा होता. या संशोधनामध्ये शिलासिंदूरच्या पुनरावृत्त मात्रांमुळे होणाऱ्या उपतीव्र विषारी परिणामांचा तसेच त्याच्या सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. या संशोधनासाठी त्यांना डॉ. भारत राठी, प्राचार्य व विभागप्रमुख, यांचे मार्गदर्शन लाभले.

आयुर्वेदातील पारंपरिक औषधांचे शास्त्रीय मूल्यमापन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संशोधनाला विशेष महत्त्व आहे. डॉ. बरखा तिरपुडे यांनी संशोधनाच्या माध्यमातून मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि ज्ञानसाधनेचे प्रतीक आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल सर्वांकडून डॉ. बरखा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

त्यांच्या हातून आयुर्वेद संशोधन, औषधनिर्माणशास्त्र आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कामगिरी घडत राहो, हीच सदिच्छा!.

Popular Articles