spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकाचवेळी ५ ढाण्या वाघांचे दर्शन

– शिक्षकांची उडाली भंबेरी 

अमरावती :- विचार करा, आपण एखाद्या घनदाट जंगलातून परत जात आहोत आणि अचानक एक दोन नव्हे, तब्बल पाच वाघ पुढे आले, तर जिवाचा थरकाप उडेलच. ५ नोव्हेंबर रोजी घरी परतणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांसोबत असाच एक अंगावर शहारे आणणारा प्रसंग घडला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत जंगलातील हा थरार त्यांनी अनुभवला.

अन् शिक्षकांची घाबरगुंडी उडाली

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अकोला परिक्षेत्रातील ढाकणा-कोहा तपासणी नाक्याजवळ गुरुवारी सायंकाळी रस्त्यावर एकाच वेळी तब्बल पाच पट्टेदार वाघांची ‘फॅमिली’ अवतरल्याने कारने प्रवास करणाऱ्या दोन शिक्षकांची अक्षरशः घाबरगुंडी उडाली.

तब्बल पाच पट्टेदार वाघ रस्त्यावर

सावऱ्या येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रामकुमार भासकर (रा. टेंब्रुसोंडा) आणि लक्ष्मीबाई अभ्यंकर विद्यालय, ढाकणा येथील कर्मचारी मुकेश इंगळे (रा. मल्हारा) हे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शाळेचे काम आटोपून चारचाकी वाहनानाने परतवाड्याकडे निघाले होते. कोहा पुलाजवळ ढाकणा-कोहा तपासणी नाक्यासमोर पोहोचताच वाहनाच्या हेडलाईटच्या लखलखत्या प्रकाशात अचानक एकामागोमाग तब्बल पाच पट्टेदार वाघ रस्त्यावर येऊन उभे राहिले.

काहींणी रस्त्यावरच मांडला ठाण

शिक्षकांनी तातडीने गाडी थांबवली. रस्त्यावर अवतरलेल्या या वाघांपैकी काही वाहनाच्या दिशेने सरसावत होते, तर काही थेट रस्त्यावरच ठाण मांडून बसले. गाडी पुढे न्यावी की मागे घ्यावी, अशा भीतीयुक्त वातावरणात दोन्ही कर्मचाऱ्यांनी अत्यंत धैर्याने वाहनातच स्तब्ध राहणे पसंत केले. या दुर्मीळ प्रसंगाचे त्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले.

Popular Articles