spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोखंडी फायटर अन् दगडांनी तरुणाला बेदम मारहाण..!

पुणे :- येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय तरुणावर लोखंडी फायटर आणि दगडांनी सामूहिक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ नोव्हेंबर रोजी पहाटे घडलेल्या या घटनेत सुरज कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, मुख्य आरोपीच्या कुटुंबातील महिला पोलीस दलात कार्यरत असल्याने पोलिसांवर दबाव टाकून आपल्याविरोधातच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप सुरजने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरच्या पहाटे सुरज कांबळे याच्यावर काही जणांनी लोखंडी फायटर आणि दगडांचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्याच्या डोक्याला सहा टाके घालण्यात आले. या संपूर्ण मारहाणीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुरज कांबळे याने मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे जोडून पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात यावा, हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्याने केली आहे.

सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे

या घटनेत सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय कागदपत्रे महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी सुरजने केली आहे.

Popular Articles