spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाऊबीजेच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई :- राज्याची राजधानी मुंबई पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. कुर्ला पश्चिम परिसरातील माकडवाला कंपाउंड येथे बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात विनोद मल्लापा पवार (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.

भरदुपारी तीन गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माकडवाला कंपाउंड परिसरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी याच भागात राहणाऱ्या विनोद पवार यांना लक्ष्य केलं. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या लागल्यामुळे विनोद रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

गंभीर जखमी अवस्थेतील विनोद यांना नागरिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन; एन्काउंटरची केली मागणी

विनोद पवार यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. संतापलेल्या नातेवाईकांनी संशयित आरोपी नेहल पवार याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी आक्रमक मागणी करत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

यावेळी एका महिला नातेवाईकाने प्रसारमाध्यमांसमोर संताप व्यक्त करताना संशयितांचे फोटो दाखवले. त्या म्हणाल्या की, “या कटात चार आरोपी सामील असून आम्हाला सीबीआय (CBI) तपासाची गरज आहे. याआधीच्या वादातही त्यांचाच हात होता. जोपर्यंत या आरोपींचे एन्काउंटर होत नाही किंवा त्यांना फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही. त्यासाठी आम्हाला वर्षभर पोलीस ठाण्यासमोर उभे राहावे लागले तरी चालेल.”

Popular Articles