spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुरात १३ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल शास्त्रीय संगीताचे आयोजन

– मोहिनीयाट्टम आणि कथ्थक नृत्याची रंगतदार मेजवानी

नागपूर :- इंटरनॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हलचा (IPAF) नववा नागपूर महोत्सव शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सायंटिफिक हॉल, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सामाजिक उद्योजक तथा IPAF चे संचालक श्याम पांडे यांच्या पुढाकारातून २३ जुलै २०१५ रोजी अहमदाबाद येथे या महोत्सवाची सुरुवात झाली. भारतीय पारंपरिक कला, संस्कृती आणि लोककलांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत देशभरात २५० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध तबलावादक, ग्रॅमी ज्युरी सदस्य आणि वंदे मातरम्‌चे राष्ट्रीय संचालक पं. प्रद्युत मुखर्जी यांचे ‘रिदम टॉक’ हे विशेष संगीत सादरीकरण आकर्षण ठरणार आहे. तसेच प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना कलामंडलम स्वर्णदीपा महंता मोहिनीयाट्टम सादर करणार असून, संस्कार केंद्राच्या कलाकारांकडून कथ्थक नृत्याचे सादरीकरण होणार आहे. भारतीय शास्त्रीय आणि समकालीन कलाप्रकारांचा संगम घडविणारा हा महोत्सव रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार असून, कलाकार, कलाप्रेमी, मान्यवर आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Popular Articles