spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खात येथे भाऊबीज निमित्त आयोजित मंडई उत्साहात संपन्न

किशोर साहू, मौदा :- खात गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज निमित्त आयोजित पारंपरिक मंडईचे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या मंडईचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य कुस्ती दंगल.या कुस्ती दंगलीमध्ये विविध गावांतील पैलवान बंधूंनी सहभाग नोंदवून आपले उत्कृष्ट कुस्ती कौशल्य आणि खेळातील जिद्द दाखवून दिली. विजयी पैलवानांना विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी आयोजक मंडळी, गावकरी तसेच बाहेरगावाहून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा पारंपरिक मंडई आणि कुस्ती स्पर्धांमुळे गावातील एकोपा, बंधुभाव आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन होते.

याप्रसंगी माजी भाजपा मौदा तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल,माजी सरपंच कैलास वैद्य,उपसरपंच रवींद्र मंडारकर, माजी पंचायत समिती सभापती राजकुमार ठवकर,स्वप्निल श्रावणकर , सरपंच आदासा संजय आतीलकर, सरपंच पिपरी (खंडाळा) रमेश चरडे,अरोली ठाणेदार सागर गोमासे, भाजपा अध्यक्ष खात गुड्डू गिरीपूंजे ,ग्राम पंचायत सदस्य राकेश बागडे, अरविंद तांबूलकर,शैलेश गिरीपुंजे , बाहेरगावाहून आलेली पाहुणे मंडळी आणि गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Popular Articles