– ४ मोटर सायकल सह १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुही :- कुही पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की मौजा चाफेगडी शिवार येथे कोंबडयाची झुंज लावून पैशांचा हारजितचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस तात्काळ घटनस्थळी जावुन धाड टाकली असता, आरोपी नामे १) हेमंत नरेश तितरमारे रा. अडम ता कुही, २) देवीदास सखाराम मुरसकर, मांढळ ता. कुही, ३) मंगेश मधुकर ढोरे, रा. वडना ता. मौदा हे कोंबड्यांच्या पायाला धारदार काती बांधुन त्यांच्यी झुंज लावुन पैशांचा हारजितचा खेळ खेळतांना मिळुन आले.
पोलीसांनी घटनास्थळावरून १) मो.सा क. एमएच ४० सीबी ३४०९ किंमती ४०,०००/- रूपये, २) मो.सा क. एमएच ३५ क्यु ९४३३ कि.५०,०००/- रूपये ३) मो. सा क. एमएच ४० सी वाय ६१९१ किंमती ५०,०००/- रूपये ४) मो.सा क. एमएच ३१ एफ डब्ल्यु ०३०५ किंमती ५०,०००/- रूपये ५) २ नग कोंबडे किंमती प्रती ७००/- रूपये असा १४,००/- रूपये ६) २ लोखंडी कात्या किंमती १००/- रूपये असा एकुन १,९१,५००/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. नमुद आरोपीविरूध्द १२ (ब) म. जु. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






