spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माळी समाजाचा राज्यस्तरीय वर-वधू परिचय मेळावा उत्साहात संपन्न

– विवाहोत्सुक युवक-युवतींना मिळाले योग्य स्थळ शोधण्यासाठी व्यासपीठ

नागपूर :- अखिल भारतीय माळी महासंघ, नागपूर आणि क्रांतिज्योती माळी विकास संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (१५ नोव्हेंबर) गीता मंदिर येथे राज्यस्तरीय माळी समाजाचा वर-वधू व पालक परिचय मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याला समाजबांधव आणि पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महासंघाचे विश्वस्त गोविंद वैराळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कृष्णाजी खोपडे, माजी आमदार अशोक मानकर, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, अरुण पवार, दीपक देशमुख, गौतम क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे विवाहयोग्य युवक- युवतींनी व्यासपीठावर येऊन स्वतःचा परिचय करून दिला. त्यामुळे विवाह इच्छुकांना तसेच त्यांच्या पालकांना योग्य स्थळांची माहिती घेण्याची व परस्पर संवाद साधण्याची संधी मिळाली.कार्यक्रमाचे संचालन गायत्री भुसारी, दीपली भेदे आणि डॉ. संगीता उमाळे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी शिवराम गुरुनुले, डॉ. विवेक भुसारी, नामदेवराव लांजेवार यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन शिवराम गुरुनुले यांनी केले.समाजातील विवाहयोग्य युवक- युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक एकोपा दृढ करणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.

Popular Articles