हिंगणा :- येथील दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनवाढीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. दिनांक १७ नोव्हेंबर पासून बेमुदत संपाची सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयातील कर्मचार्यां प्रमाणे दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावा याकरिता हा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३४ हजार कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत . गेल्या २२ महिन्यापासून सुधारित वेतन वाढीचा प्रस्ताव मा . उच्च न्यायालयाने शासनाकडे पाठविलेला आहे परंतु आजपावेतो प्रस्ताव प्रलंबित असून अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे समान काम समान वेतन याप्रमाणे जिल्हा न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू करावे. अशी मागणी न्यायालयीन कर्मचारी यांची आहे. सदर मागणी करिता दि. १५ सप्टेंबरला कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून कामकाज केले . त्यानंतर दि. १६ व १७ आक्टोंबरला काळी फीत लावून कामकाज केले . तरीही शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे बेमुदत आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला . सदर बेमुदत आंदोलनात तालुका हिंगणा कोर्टातील कर्मचारी जे. एस .ढाकणे सहा. अधीक्षक, लघुलेखक निशा बीसणे , नाजीर भास्कर रामटेके , वरिष्ठ लिपीक सुशील फुकटे , वरिष्ठ लिपिक मीना पाढळकर , कनिष्ठ लिपिक स्वप्निल शिंदे , रुपचंद रिंगणे , गौरव नंदेश्वर , चंदन जाधव, साबिया शहा, बेलीफ नितीन बरगट , धीरज आगळे, मुरलीधर लांडगे, वैशाली कांबळे, शिपाई मनीष मसराम, मोनिका बोंद्रे , पहारेकरी सुभाष हनवते आदी कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
Latest News
Related Posts
महाराष्ट्र न्यायालयीन कर्मचारी सुधारीत वेतनवाढीसाठी बेमुदत संपावर….






