spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा परिसरातील डोलोमाईट खाणकामाच्या प्रदूषणावर उपाययोजनांची प्रक्रिया सुरू

खापा :- एका वृत्तपत्रात खाणकाम ब्लास्टिंगमुळे शेतीचे नुकसान या शिर्षकाखाली बातमी प्रसिध्द झाली. सदर बातमी अनुषंगाने खापा परिसरातील डोलोमाईट खाणकाम व क्रशिंग प्रक्रियेमुळे परिसरातील शेतीवर होणाऱ्या परिणामांच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच संबंधित कंपनीच्या मालकाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

याअनुषंगाने संबंधित ठिकाणी उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरातील सुमारे १० ते १२ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीवर धूळ व प्रदूषणाचा परिणाम होत असल्याबाबत समस्या मांडल्या.

या विषयावर उपविभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अधिकारी, बाधित शेतकरी व संबंधित कंपनीचे मालक यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कंपनी मालक यांच्या उपस्थितीत पुढील बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, आज करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षणाच्या अनुषंगाने क्रशिंग प्रक्रियेमुळे होणारे वायुप्रदूषण नियंत्रित व कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधित कंपनीला सुचना दिलेल्या आहे.

Popular Articles