spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दत्तक जागरूकता महिन्यानिमित्त नागपुरात भव्य बालमहोत्सव उत्साहात संपन्न

– बालहक्क, बालसंरक्षण आणि दत्तक प्रक्रियेबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन; १५० हून अधिक बालकांचा सहभाग

नागपूर :- दत्तक जागरूकता महिन्यानिमित्त (१ ते ३० नोव्हेंबर) पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी, बालदिनाचे औचित्य साधून पंचवटी नगर, इट्टाभट्टी चौक येथे न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित राष्ट्रीय दत्तक ग्रहण शिशुगृहाच्या वतीने भव्य बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत यांनी बालहक्क व बालसंरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. समितीच्या सदस्या विजया साहू, विनायक नंदेश्वर तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी बालकांच्या हक्क, समस्या व गरजांवर प्रकाश टाकला. साधना हटवार यांनी दत्तक प्रक्रिया, मिशन वात्सल्य आणि CARA नियमांची माहिती दिली. संस्थेच्या अधीक्षिका पूजा झोडे यांनी २००५ पासून संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बालकल्याण योजनांची माहिती दिली. विशेष दत्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत १२५ बालकांना देशांतर्गत, तर १० बालकांना परदेशात नियमानुसार दत्तक देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे सचिव सनमकुमार गोंडाणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. उपाध्यक्षा चंदा गोंडाणे यांनी मान्यवरांचा सत्कार केला, तर अध्यक्ष सी.के.गोंडाणे यांनी आभार मानले. नितीन विंचूरकर यांच्या संगीत कार्यक्रमाने बालमहोत्सवात रंगत आणली. कार्यक्रमाला १५० हून अधिक बालके आणि १०० महिला-पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles