किशोर साहू, मौदा :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, सिरसोली यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र पोर्टलमार्फत झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सिरसोली येथील प्रफुल निमकर यांची शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही वाचनालयाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रफुल निमकर यांच्या या यशामुळे सिरसोली गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या यशाचे उपस्थितांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, यासाठी अशा सत्कार समारंभातून प्रेरणा मिळते.
या कार्यक्रमाला वाचनालयातील वाचकवर्ग तसेच सुमित भुते, राहुल निमकर, जुमदेव वंजारी, विलास निमकर, अनिकेत भुते, अतिश निमकर, संकेत जगणित, ललित निमकर, लोकेश निमकर, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मदनकर, पोलीस पाटील पायल निमकर, दिपाली वंजारी, सुहासिनी तुमसरे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता.
प्रफुल निमकर यांच्या निवडीबद्दल सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






