spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटी, कन्हानच्या नव निर्वाचित कार्यकारिणीची घोषणा

कन्हान :- बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटी कन्हानच्या सन २०२६ च्या कार्यकारिणी निवडणुकीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात कन्हान बुद्ध विहार येथे पार पडली. या निवडणुकीत सोसायटीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

सदर निवडणूक आदरणीय आर्य नागार्जुन सुरई ससाई भंतेजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. मृणाल भेलावे यांनी जबाबदारी सांभाळली. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रथम सकाळी १० वाजता मतपत्रिका व मतपेटीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर सकाळी १०. १५ वाजता मतदानास सुरुवात झाली. सदस्य पदासाठी सहा उमेदवारांमधून पाच सदस्यांची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.

नवनिर्वाचित निर्विरोध निवडून आलेले पदाधिकारी

कार्याध्यक्ष – भगवान नितनवरे, उपाध्यक्ष – दौलतराव ढोके, सरचिटणीस (सचिव) – अनिल डोंगरे, चिटणीस (सहसचिव) -स्वप्निल वाघधरे, कोषाध्यक्ष – दिलीप धनविजय,

 नवनिर्वाचित निवडून आलेले कार्यकारिणी सदस्य

सदस्य – १) सुदाम नितनवरे, २) मुकेश वाघमारे, ३)

पूनम उके, ४) कल्पना नितनवरे, ५) दुर्गा गजभिये .

सदस्य पदासाठी एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी पाच उमेदवारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमुळे बुद्धिस्ट वेल्फेअर सोसायटीच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळणार असून समाजातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धम्मविषयक उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आणि नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles