– सूर्यदेव आणि छठी मातेला कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी साकडे
कन्हान :- लोकश्रद्धा, निसर्गपूजा आणि सूर्योपासने चे प्रतीक असलेले छठ महापर्व जुनीकामठी कन्हान नदी परिसरात मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्ति भावाने साजरे करण्यात आले.
या पवित्र पर्वानिमित्त श्रीमती पिंकी बिमल शर्मा आणि उर्वशी कुमारी यांनी कुटुंबीयांसह भगवान सुर्य देव आणि छठी मातेची विधिवत पूजा-अर्चना केली. यावेळी कुटुंबातील सदस्य तसेच परिसरातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. कुटुंबाच्या सुख, समृद्धी, शांती, उत्तम आरोग्य आणि कल्याणा साठी सूर्यदेव व छठी मातेला प्रार्थना करण्यात आली.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वि आयोजनासाठी विमल कुमार, संजय शर्मा तसेच संपूर्ण शर्मा परिवाराने विशेष सहकार्य केले. छठ महापर्वाच्या निमित्ताने सर्व भाविकांमध्ये भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. सूर्यदेव आणि छठी मातेच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, अशी मंगलकामना यावेळी व्यक्त करण्यात आली.






