spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोटार पंप व केबल चोरीचे ०६ गुन्हे उघड, ३ आरोपी अटक

– ८४ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त  

 नरखेड :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि  पराग पोटे, उपविभागिय पोलीस अधिकारी, काटोल उपविभाग यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक मंगला मोकाशे प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन नरखेड यांच्या नेतृत्वात दिनांक १६/११/२०२६ रोजी नरखेड पोलीसांनी पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील शेतशिवारातून मोटार पंप, केबल वायर तसेच इतर साहित्य चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघड करून तिन आरोपीतांना अटक केली आहे.

पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत दिनांक ३०/०९/२०२६ ते दि. ०१/१०/२०२६ रोजी नरखेड शिवारात नाडेकर कॉलेज जवळील शेतात झालेल्या चोरीच्या अप. क्र. ८२५/२०२६, कलम ३०३(२), ३(५), ३१७ (२), भा.न्या.सं. अन्वये दाखल गुन्हयाचा तपास करीत असतांना नरखेड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवुन आरोपी विक्की पुंजाजी तुमडाम, वय २६ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ३, नरखेड २) रोशन ऊर्फ अघोरी शंभू उईके, वय २३ वर्षे, रा. दुर्गा मंदिराजवळ, नरखेड ३) कल्पेश किसनाजी ईरपाची, वय २९ वर्षे, रा. वॉर्ड क्र. ३, नरखेड यांना निष्पन्न केले. आरोपींकडे कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता त्यांनी संगनमत करून नरखेड परिसरातील नरखेड शेतशिवार, टोळापार-पिंपळगाव शेत शिवार, सावरगाव शेत शिवार, तिनखेडा शेत शिवार, भायवाडी शेत शिवार, नांदोरी रीठी शेत शिवार नरखेड येथून मोटार पंप तसेच केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातून गुन्हयात वापरलेली दुचाकी किंमती ३०,०००/- रूपये, विविध गुन्हयातील मोटार पंप, केबल वायर तसेच इतर साहित्य असा एकूण ८४,८००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हयातील तिनही आरोपीतांना अटक करण्यात आले आहे.

Popular Articles